केळवली धबधब्यात बारावीचा विद्यार्थी बुडाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेला प्रसिध्द केळवली धबधबा या ठिकाणी एक युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहरातील वायसी काॅलेजचा बारावीत शिकत असलेला राहुल सुभाष माने (रा. विकासनगर, सातारा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साताऱ्यातील चार मित्र केळवली धबधबा पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. राहूल माने आपल्या मित्रांसोबत धबधब्यात पोहोत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्रांना राहूल याला वाचविण्यात यश आले नाही.

दरम्यान, काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. धबधब्याच्या पाण्यात बुडालेल्या राहुल मानेला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलीस आणि रेस्क्यू टीम कसोशीने प्रयत्न करत आहे. या घटनेने पर्यटन स्थळांवर पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेचा अभाव दिसून आला आहे. वनविभाग आणि जिल्हा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर गस्त वाढवण्याची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.

Leave a Comment