सातार्‍यात ९ तर कराडात ४ रुग्ण कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच पुणे, मुंबईवरून आलेल्या काहींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिनांक १५ मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले ७ प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दि.२८ मार्च रोजी ४८ वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, दि.२९ मार्च रोजी ८० वर्षीय पुरुष व ४ वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि आज दि.३० मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे. या सर्व 4 रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसेच सातारा जिल्हयातील १ पुरुष व १ महिला असे दोन रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन आज दाखल करून घेण्यात आले. सदर कोरोनासंशयितांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

Leave a Comment