जन्मदात्या बापानेच केला १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे 

तासगाव तालुक्यातील एका गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून वडीला विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादी आपला नवरा  व तेरा वर्षीय एक मुलगी, पाच वर्षाचा एक मुलगा असे एकत्रित तासगांव तालुक्यातील एका द्राक्षबागेत कामास राहिले आहेत. २३ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास फिर्यादी मुलगी, मुलगा जेवण करून झोपी गेले होते. रात्री १२ च्या दरम्यान संशयित दारू पिऊन घरी आला व झोपी गेलेल्या १३ वर्षीय मुलीस उठवून तिच्यावर बलात्कार केला.

यावेळी फिर्यादी या आपल्या पतीस अशा कृत्यापासून बाजूला करण्यास गेल्या असता त्यांना शिवीगाळ करून बाजूला ढकलून दिले. तसेच पिडीत मुलगी व फिर्यादी यांना याबाबत कोणास काही सांगितले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी ही दिली. दिलेल्या या फिर्यादी वरून मुक्तार शेख यास अटक करण्यात आली असून अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Comment