बागेत खेळायला गेलेल्या 13 वर्षीय मुलीसोबत आरोपीचे ‘हे’ धक्कादायक कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात मागच्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका शाळकरी मुलीवर शाळेच्याच बाथरूममध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आता रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बागेत अत्याचार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका अनोळखी इसमाने अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 24 मार्च रोजी घडली. त्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी मैत्रीणीसोबत एका बागेत गेली होती. त्यावेळी गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या रंगाने काळसर आणि शरीरयष्टीने जाडजुड असलेल्या एका अनोळखी इसमाने तिच्यासोबत अतिप्रसंग केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.

आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना त्याचा मोबाइल तिथेच पडला. यानंतर आपला मोबाइल पीडित मुलीने घेतला आणि तो घेऊन जात असताना आरोपी पुन्हा तेथे आला. त्यानंतर आरोपीला पाहून भेदरलेल्या मुलीने तो मोबाइल तिथेच टाकून पळ काढला आणि आपला जीव वाचवला. यानंतर आरोपीने आपला मोबाईल घेतला आणि तिकडून पळ काढला. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरिक्षक सतीष अस्वार हे पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment