धक्कादायक ! वर्गमित्रानेच ब्लॅकमेल करत केला बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नदिया : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील नदिया या ठिकाणी एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला होता. यामधून त्या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच अल्पवयीन आरोपी बांगलादेशामध्ये पळाला आहे. त्याठिकाणी या आरोपीचा आजोबा राहतात.

नदिया कार्यक्षेत्रात येणाऱ्या धनताला पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी आपल्या परिवारासह बांगलादेशात पळाला आहे. त्यामुळे पोलीस त्याला परत आणण्याची तयारी करत आहेत. या आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची छेड काढली होती. तिच्याशी शारीरिक गैरवर्तन करत आरोपीने काही फोटो काढले होते. यानंतर हे फोटो वायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता.

आपल्यासोबत घडणाऱ्या अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली तर बदनामी होईल या भीतीने सातवीत शिकणारी पीडिता आरोपीचा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. 13 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने धनताला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी दुसऱ्या देशात फरार झाल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यानंतर आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Leave a Comment