शेतकऱ्यांना लवकरच मिळू शकतील PM Kisan Yojana च्या13 व्या हफ्त्याचे पैसे !!! मात्र पूर्ण करावे लागेल ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. PM किसान सन्मान निधी योजना ही त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. आता एका ताज्या अपडेटनुसार, जानेवारी महिन्यात कधीही या योजनेच्या पुढील हप्त्याचे 2 हजार रुपये येऊ शकतात. हे लक्षात घ्या कि, ही रक्कम DBT च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 12 हप्ते ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता शेतकरी 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. PM Kisan Yojana

What is PM-Kisan Samman Nidhi Yojana? Check Registration Process, Eligibility, Documents Required, Toll-free Number and More

या आठवड्यात मिळू शकतील पैसे

आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता पाठवण्यात आला होते. ज्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच 2,000 रुपये पाठवून भारत सरकार शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट देऊ शकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. PM Kisan Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana 2022 : PM Kisan Samman Nidhi E-Kyc Status Check |

लाभार्थ्यांच्या संख्येत होणार घट

सरकार कडून आता जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीला वेगाने सुरुवात केली गेली असून, त्यामध्ये दररोज अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. ज्यामुळे असे मानले जाते आहे की, 12 व्या हप्त्याप्रमाणेच पुढील 13 व्या हप्त्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या संख्येत घट होऊ शकेल. 12 व्या हप्त्यादरम्यान, राज्यांमधील अनेक लाभार्थ्यांची नावे या योजनेच्या लिस्टमधून वगळण्यात आली होती. जर आपणही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर ते शक्य तितक्या लवकर करून घ्या. अन्यथा आपलेही नः या लिस्टमधून वगळले जाऊ शकते. PM Kisan Yojana

How to register complaint regarding PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान सम्मान निधि की किश्त नहीं मिली तो ऐसे करें शिकायत | Patrika News

इथे करा संपर्क

PM Kisan Yojana च्या 13व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांना अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधता येईल. याबरोबरच पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधता येईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

हे पण वाचा :
Train Cancelled : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वेकडून 221 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Loan : फक्त 1% व्याजावर मिळेल कर्ज !!! अशा प्रकारे मिळवा फायदा
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये फक्त एकदाच प्रीमियम भरून मिळेल दरमहा पेन्शन
Flipkart Sale : 6999 रुपयांमध्ये मिळत आहेत ‘हा’ स्मार्टफोन, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंतच
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या