व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Flipkart Sale : 6999 रुपयांमध्ये मिळत आहेत ‘हा’ स्मार्टफोन, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंतच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बंपर ऑफर (Flipkart Sale) आणि सवलतींसह स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आता आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेला इयर एंड सेल 31 डिसेंबरला संपणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या स्मार्टफोनवर अनेक धमाकेदार ऑफर मिळत आहेत. या सेलमध्ये (Flipkart Sale) तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन एमआरपीवरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच या सेलमध्ये तुम्हाला ICICI, SBI आणि Kotak Bank च्या कार्डवरून पेमेंट केल्यास 10 % पर्यंत त्वरित सूट मिळेल. एवढचं नाहीतर या सेलमध्ये उत्तम एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सेलमधील टॉप 3 डील्स बद्दल….

1) Redmi
Redmi चा हा बजेट स्मार्टफोन सेलमध्ये (Flipkart Sale) अगदी स्वस्तात उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत16,999 रुपये आहे, परंतु तुम्ही सेलमध्ये हा फोन 11,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच जर तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 500 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील मिळणार आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन खरेदी केल्यास तुम्हाला 10,800 रुपयांपर्यंतचा अजून फायदा मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला हा फोन केवळ 6999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

2) Oppo F19 Pro+
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 29,990 रुपये आहे. सेलमध्ये, डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 17,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला या स्मार्टफोनवर 3000 रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळू शकते. तसेच कंपनी या स्मार्टफोनवर 16,550 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

3) Vivo T1 Pro
6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या 5G फोनची MRP 23,999 रुपये आहे. बँक ऑफर अंतर्गत, तुम्ही या फोनवर 3000 रुपयांपर्यंत अतिरिक्त झटपट सूट देखील मिळवू शकता. तसेच कंपनी फोनवर 17,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका