प्रेमसंबंधातून विवाहितेची फसवणूक करत घातला 14 लाखांचा गंडा, पाचजणांवर गुुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून कर्जत येथे राहणार्‍या महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण करून तिच्याकडून 14 लाख रुपये उकळून महिलेची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून शहनिशा करून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन भाऊसाहेब गुंजाळ, सागर भाऊसाहेब गुंजाळ, विमल भाऊसाहेब गुंजाळ, महेश सोगे आणि श्रीकांत नरेंद्र राजे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पीडित महिलेचे सांगली हे माहेर आहे. काही वर्षांपूर्वी पीडित महिलेचा विवाह रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एकाशी झाला होता. संशयित गुंजाळ व सोगे हे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे राहतात. यातील सचिन गुंजाळ याने पीडित महिलेशी ओळख निर्माण केली. आपण अविवाहित असल्याचे सांगून महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडित महिला या आपल्या माहेरी सांगली मध्ये आल्या. संशयित गुंजाळ याने सांगलीतील डीमार्ट, पंढरपूर रोड तसेच विश्रामबाग चौक परिसर याठिकाणी नेऊन पीडित महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित महिलेचा विश्वास संपादन करून 14 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले.

यानंतर महिलेशी जवळीक साधून मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पीडितेची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली. गुंजाळ याचं सत्य समोर आल्यानंतर पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता गुंजाळ याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ करून तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. गुंजाळ कुटुंबियांकडून होणार्‍या वारंवार त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

Leave a Comment