मराठवाड्यातील 14 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील 100 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी केलेले असून ते तिकडेच अडकले आहेत. विभागीय प्रशासनाकडे काल उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील 14 जण परत आल्याची माहिती कळवली आहे. यातील अनेक जण दिल्लीत आणि मुंबईत असून ते सोमवारी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतील.

लातूरचे ऋतुजा देशमाने, वेदांत शिंदे, परभणीतील संजीवकुमार इंगळे, जालन्यातील किरण भंडारी, संकेत उखर्डे, तेजस पंडित, सुयोग धनवाई, नांदेड मधील स्नेहा महाबळे, प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, संजीवनी वन्नाळीकर, सत्यम गवळी, दीपक काकडे, उस्मानाबादची केतकी कोकाटे असे 14 जण काल परतले.

युक्रेनमधील व्हिनयस्टा, युझोई, ओबॅस्क, ओडेसा, किव्ह, लिव्ह, जॉर्जिया आदी ठिकाणच्या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत. रशियाकडून राजधानी किव्हसह विविध ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला होत आहे.‌

Leave a Comment