धक्कादायक ! प्रेयसी गर्भवती असल्याचे समजताच प्रियकरानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या घटनांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. अशीच एक धक्कादायक घटना अर्जेंटिनामध्ये घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षांच्या शाळकरी मुलीचा तिच्याच 14 वर्षांच्या मित्राने दगडाने ठेचून खून केला. ही मुलगी त्याच्यापासून गरोदर असल्यामुळे त्याने तिची हत्या केली आहे. हि घटना 24 ऑगस्ट रोजी घडली आहे.

या मुलीचा मृतदेह एका निर्जन स्थळी आढळला. यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये या मुलीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं, तसंच ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. तसेच या मुलीचा खून दगडाने ठेचून झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या मृत मुलीचे नाव लुसिया फर्नांडिस असून तिचे तिच्याच वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातुन ती गर्भवती झाली. 24 ऑगस्ट रोजी जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा या मुलीने प्रियकराला तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितले. त्या वेळी तो घाबरला. यानंतर त्याने दगडाने ठेचून आपल्या प्रेयसीची हत्या केली.

मुलीच्या घरच्यांनी जेव्हा या मुलीचा शोध घेतला तेव्हा त्यांना लुसिया एका निर्जन स्थळी सापडली; पण त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तसेच तिचा चेहरा दगडाने छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून तिच्या वडिलांनी टाहो फोडला. आपल्या मुलीला इतक्या क्रूरपणे ठार मारणाऱ्या त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लुसियाच्या वडिलांनी केली आहे.

Leave a Comment