माझ्या मुलाला मोबाइल विकला म्हणून आरोपीने 14 वर्षीय मुलासोबत केले ‘हे’ कृत्य

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मोबाइल विकल्याच्या कारणातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा जीव घेतला आहे. आरोपीने मृत मुलाला आपल्या घरी बोलावून अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे मृत मुलगा जागीच बेशुद्ध झाला. यानंतर उपचारादरम्यान पीडित मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
लहू लिंबराज खिळदकर असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर राजू खिळदकर असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि मृत मुलगा हे दोघेही आष्टी तालुक्यातील नांदूर येथील रहिवासी आहेत. मृत लहू याने त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या राजू खिळदकर याच्या मुलाला आपला मोबाइल फोन विकला होता. याचा राजू खिदळकर याला खुप राग आला होता. यानंतर आरोपीने मृत लहुला घरी बोलावून ‘तू माझ्या मुलाला मोबाइल फोन का विकला?’ असा जाब विचारला. यावेळी आरोपीने मृत लहूला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हि मारहाण एवढी भयंकर होती कि, लहू जागीच बेशुद्ध पडला. या धक्कादायक घटनेनंतर त्यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान लहुचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत मुलाचे वडील लिंबराज झुंबर खिळदकर यांनी आरोपीविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लहुचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी राजू खिळदकर फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंभोरा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.