140 किलोच्या कॉर्नवॉलने स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल….पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सिबलीला पायचीत झाला. नंतर कर्णधार जो रुट आणि रॉरी बर्न्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार जो रुट धावबाद होऊन माघारी परतला. बर्न्सने अर्धशतक पूर्ण केल्यावर स्टोक्स बाद झाला. पण बर्न्सची विकेट विशेष कौतुकाची ठरली

रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर बर्न्स माघारी परतला. १४० किलो वजनाच्या रहकीम कॉर्नवॉलने स्लिप मध्ये त्याचा अफलातून झेल घेतला. क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्त्व असतं असं म्हणतात पण कॉर्नवॉलसारख्या अगडबंब फिल्डरने स्लिपसारख्या ठिकाणी अतिशय चपळाईने झेल घेतला त्यामुळे तो झेल विशेष कौतुकाचा ठरला. बर्न्स ५७ धावांवर खेळताना चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि वेगाने कॉर्नवॉलच्या दिशेने गेला. कॉर्नवॉलने आवश्यक ती चपळाई दाखवत पटकन झेल टिपला आणि बर्न्सला माघारी धाडलं.

बर्न्स बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या ओली पोप आणि जोस बटलर यांनी विंडीजच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. पोप (नाबाद ९१) आणि बटलर (नाबाद ५६) या दोन्ही फलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत १३६ धावांची भागीदारी रचली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment