जुनी परंपरा पूर्ण करण्यासाठी ‘या’ बेटावर केली गेली तब्ब्ल 1428 डॉल्फिनची हत्या, संपूर्ण समुद्राचा किनारा रक्ताने लाल झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोपनहेगन । जुनी परंपरा पूर्ण करण्यासाठी 1400 हून अधिक डॉल्फिनच्या डेन्मार्कच्या मालकीच्या फॅरो बेटांवर कत्तली करण्यात आल्या. या घटनेनंतर या जुन्या परंपरेवर जगभरात निषेध सुरू झाला आहे. एका एनिमल एक्टिविस्ट ग्रुपने समुद्र किनाऱ्यावर मृत अवस्थेत पडलेल्या अशा शेकडो डॉल्फिनचा व्हिडिओही शेअर केला आहे. समुद्राचे पाणी रक्ताने लाल झाले आहे आणि त्यांचे फोटोज पाहून अंगावर काटे उभे राहत आहेत. या बेटावर आयोजित ‘ग्राइंड’ नावाच्या पारंपारिक शिकार कार्यक्रमादरम्यान अनेक डॉल्फिनच्या शिकार करण्यात आल्या. या घटनेत सुमारे 1428 डॉल्फिन मारले गेले.

निर्दयपणे शिकार केली
एनिमल वेल्फेअर ग्रुप शी शेफर्डने 12 सप्टेंबर रोजी या डॉल्फिन शिकारीची छायाचित्रे शेअर केली. त्यांनी लिहिले की, या शिकारींनी पहिले डॉल्फिनच्या कळपांना घेरले आणि उथळ पाण्याच्या दिशेने त्यांचा पाठलाग केला आणि नंतर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांना ठार मारले. डॉल्फिनमधून इतके रक्त बाहेर आले की सगळा समुद्रकिनारा लाल झाला.

ग्राइंड फंक्शन काय आहे?
ग्राइंड फंक्शन हा पारंपारिक सोहळा आहे. त्याची सुरुवात शेकडो वर्षांपूर्वी झाली होती. हा कार्यक्रम कायदेशीररित्या वैध आहे. ज्यामध्ये शिकार केली जाते. दरवर्षी उन्हाळ्यात ही शिकार आयोजित केली जाते. समुद्रात सापडलेल्या पाण्यातील प्राण्यांची शिकार केली जाते. या प्राण्यांची शिकार केल्यानंतर हे शिकारी त्यांचे मांस खातात.

हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
एनिमल वेल्फेअर ग्रुपचा दावा आहे की,”डॉल्फिनची संख्या इतकी जास्त आहे की त्यांच्या मांसाचा पूर्ण वापर होणार नाही. दृश्य खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे आहे. मानवी परंपरेच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करण्यापासून आपण परावृत्त होत नाही. शिकार करण्याच्या नावाखाली, बलिदानाच्या नावाखाली निरपराधांची हत्या करणे कोणत्याही प्रकारे न्याय्य ठरू शकत नाही. याला विरोध झालाच पाहिजे.”

Leave a Comment