दिलासादायक ! अमरावतीत 15 कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; आज मिळाला डिस्चार्ज

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती येथील कोविड रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या 15 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारांनंतर निगेटिव्ह आला. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला.

यात 10 पुरुष व्यक्ती व 5 महिलांचा समावेश आहे. कमिला ग्राऊंड येथील तीन महिला व एक पुरुष, हैदरपुरा येथील 2 पुरुष, बडनेरा येथील एक महिला, तारखेडा येथील तीन पुरुष, खोलापुरी गेट येथील 2 पुरुष, एक महिला, चेतनदास बगिचा येथील एक पुरुष असे 15 कोरोनामुक्त नागरिकांना अमरावती कोविड रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी  ब-या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत. आजपर्यंत बरे होऊन परतलेल्या नागरिकांची संख्या ही २१ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here