कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.
१ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एक पुरु्ष रुग्णाचा (वय ३५ वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. सदर कोरोना बाधित रुग्ण मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळत आहे. गेले काही दिवस सदर व्यक्ती गावीच राहत होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्यांची प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील परदेश प्रवास करुन आलेले ९ नागरिक व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले ९ नागरिक अशा एकूण १८ नागरिकांना अनुमानित रुग्ण म्हणून येथील जिल्हा रुग्णालयात ३ व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे १५ नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यातील ९ नागरिक हे परदेश प्रवास करुन आलेले असुन त्यामध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ५ पुरुष व ४ महिला आहेत. तसेच ७ नागरिक हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले असुन त्यामध्ये २० ते ८४ वयोगटातील ५ पुरुष व २ महिला असून १ वर्षाच्या मुलाचा व मुलीचा यात समावेश आहे.
दरम्यान, कराड येथील रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण ३० जण संशयित म्हणून दाखल झाले आहेत. यातील १८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे. तर ११ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण
खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी
कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित
निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली
‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा