CMIE च्या आकडेवारीत झाला खुलासा, ऑगस्ट महिन्यात 15 लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या

नवी दिल्ली । देशातील बेरोजगारीचे प्रमाण ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा वाढले आहे. खरं तर, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने देशातील बेरोजगारीसंदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात 15 लाखांहून अधिक लोकं औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रांमधून बेरोजगार झाले आहेत.

CMIE चे आकडे दर्शवतात की,”नोकरदार लोकांची संख्या जुलैमध्ये 399.38 मिलियन वरून ऑगस्टमध्ये 397.78 मिलियन झाली. केवळ या एका महिन्यात ग्रामीण भारतात सुमारे 13 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या.”

ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर 8.32 टक्के होता
CMIE च्या मते, ऑगस्टमध्ये देशात बेरोजगारीचा दर 8.32 टक्के होता, तर जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 6.95 टक्के होता. शहरी बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये सुमारे 1.5 टक्क्यांनी वाढून 9.78 टक्के झाला. जुलैमध्ये देशातील शहरी बेरोजगारीचा दर 8.3 टक्के होता. जूनमध्ये ते 10.07 टक्के, मेमध्ये 14.73 टक्के आणि एप्रिलमध्ये 9.78 टक्के होते. मार्च महिन्यात, कोरोना संसर्गाची दुसरी लाट भारतात येण्यापूर्वी, शहरी बेरोजगारीचा दर सुमारे 7.27 टक्के होता.

ग्रामीण बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढून 7.64 टक्के झाला
त्याचप्रमाणे देशातील ग्रामीण बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढून 7.64 टक्क्यांवर पोहोचला. जुलैमध्ये ते 6.34 टक्के होते. CMIE डेटा दर्शवितो की जुलैमध्ये, जेथे सुमारे 3 कोटी लोकं काम शोधत होते, ऑगस्टमध्ये 3.6 लोकं काम शोधत होते.