एकटी असल्याचा फायदा घेत मुलीवर गॅंग रेप; आई रागावल्याने नाराज होऊन घरातून गेली होती निघून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । आई रागावल्याने नाराज होऊन घराबाहेर गेलेल्या मुलीला तिघांनी फूस लावून एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बिहारमधील पाटणा येथे ही धक्कादायक घटना घडली. पाटण्यातील दीघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेने तक्रार केल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई शनिवारी तिला रागावली होती. त्यामुळे नाराज होऊन ती घरातून निघून गेली होती. त्याच दरम्यान तीन तरुणांनी मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिला सोबत येण्यास सांगितले. तिघांनी तिला फूस लावून दुचाकीवर बसवून नेले. एका हॉटेलात गेल्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी सतर्क झाले. ते येईपर्यंत आरोपी तेथून पसार झाले. आरोपींची ओळख पटली असून, त्यात दोघे भाऊ असून, एक त्यांचा मित्र आहे. हे तिघेही एकाच परिसरात राहतात. पोलीस त्यांच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पीडितेचा जबाब लवकरच नोंदवून घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment