चीनबाहेर कोरोनाव्हायरसचे 1,500 नवीन रुग्ण ; वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांत चीनबाहेर कोरोनाव्हायरसचे 1,500 हून अधिक नवीन रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. चीनबाहेर मृतांचा आकडा 24 ते 128 पर्यंत वाढला आहे. कोरोनाव्हायरस आजाराच्या ताज्या अहवालात, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, चीनबाहेर कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 64 देशांमध्ये 1,598 ने वाढून 8,774 झाली आहे. दिल्ली, तेलंगणा आणि बेंगळुरू येथून भारतात कोरोनाव्हायरसची तीन रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. चीनच्या मुख्य भूमीत कोरोनाव्हायरसमुळे मृतांची संख्या वाढून 2,912 झाली आहे.

कोरोनाव्हायरस नेमका फुफ्फुसांवर कसा आणि काय परिणाम करतो आहे, कोरोना फुफ्फुसांची अक्षरक्ष: वाट लावतो आहे.  चीनच्या लंझाऊतील एका रुग्णालयात दाखल असलेल्या ३३ वर्षीय कोरोनाव्हायरसच्या रुग्णाच्या छातीचा एक्स-रे घेण्यात आला. यानंतर धक्कादायक असं चित्र समोर आलं. सार्सप्रमाणेच कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत आहेत.

न्युमोनिया आणि कोरोनाव्हायरसची लक्षणं सारखी दिसत असली तरी न्युमोनियाच्या तुलनेत कोरोनाव्हायरस खूप झपाट्याने पसरतो आहे आणि अँटिबायोटिक्सचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही आहे, अशी आणखी एक धक्कादायक माहिती रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment