Train Cancelled : जन्माष्टमीच्या दिवशी देखील Railway कडून 157 गाड्या रद्द, अशा प्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : हवामान, काही ऑपरेशनल समस्या आणि दुरुस्तीच्या कामांमुळे रेल्वेकडून दररोज मोठ्या प्रमाणावर गाड्या रद्द केल्या जात आहेत. अशा अचानक गाड्या रद्द होण्याने प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. आज (19 ऑगस्ट रोजी) जन्माष्टमी सणाच्या दिवशी देखील रेल्वेकडून देशभरात मिळून एकूण 157 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Canceled Train List: Railways canceled 120 trains, see the list here -  Rightsofemployees.com

खराब हवामान आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर रेल्वेने 5 गाड्यांचे पूर्ण वेळापत्रकच बदलले आहे तर अन्य 12 गाड्या या इतरत्र वळवण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या या एकूण 157 गाड्यांपैकी 37 गाड्या अंशत: तर 120 गाड्या या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. Train Cancelled

Indian Railways Update: Western Railway to Run 442 Trips of Summer Special  Trains

अशा प्रकारे जाणून घ्या स्टेट्स

हे जाणून घ्या कि, भारतीय रेल्वेच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन उपलब्ध जात आहेत. त्यामुळे, जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर घर सोडण्यापूर्वी एकदा आपल्या ट्रेनचे स्टेट्स जाणून घेणे महत्वाचे ठरेल. त्यासाठी रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes वेबसाइटवर किंवा IRCTC ची वेबसाइट https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 can वर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येईल.

रेल्वेच्या वेबसाइटद्वारे ट्रेनचे स्टेट्स कसे तपासावे हे समजून घ्या …

रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासण्यासाठी सर्वांत आधी http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर भेट द्या.
यावर Exceptional Trains हा पर्याय दिसेल. तो निवडा.
रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांच्या लिस्टवर क्लिक करा.
येथे संपूर्ण माहिती मिळेल. Train Cancelled

All you need to know about consumer protection in railway services -  iPleaders

ट्रेन रद्द झाल्यावर रिफंड देखील मिळतो

हे लक्षात घ्या कि, ज्या प्रवाशांनी IRCTC वेबसाइटद्वारे ई-तिकीट बुक केले आहेत त्यांना तिकिटांच्या रिफंडसाठी काहीही करण्याची गरज नाही. अशावेळी जर ट्रेन रद्द झाली तर रिफंड थेट ग्राहकाच्या बँक खात्यात/क्रेडिट कार्ड/ई-वॉलेटमध्ये जमा केला जाईल. जर रिझर्वेशन काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल, तर ते कोणत्याही कॉम्प्युटराइझ्ड रिझर्वेशन काउंटरवर जाऊन ट्रेन सुटल्यानंतर 72 तासांपर्यंत रद्द करता येईल. जर प्रवाशाने स्वतःहून तिकीट रद्द केले तर IRCTC कडून थोडा कॅन्सलेशन चार्ज रिफंड मधून कट केला जाईल. प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगिरीसाठीचा कॅन्सलेशन चार्ज वेगवेगळा आहे. Train Cancelled

हे पण वाचा :

Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!

Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च

Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!

Train Cancelled : रेल्वेकडून आज विविध कारणांमुळे 133 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!