PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना KYC अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका ट्विटमध्ये बँकेकडून म्हटले गेले आहे की, 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व ग्राहकांनी KYC करून घ्यावे. गेल्या अनेक महिन्यांपासून, बँक आपल्या ग्राहकांना KYC करण्याबाबत सतर्क करत आहे. KYC केल्याने, ग्राहकांचे बँक खाते ऍक्टिव्ह होईल, जेणेकरून त्यांना फंड ट्रांसफरसारख्या अनेक गोष्टी सहजपणे करता येतील.

PNB to make high-value cheque verification system mandatory to protect bank  customers against frauds | Business News – India TV

ट्विट द्वारे दिली माहिती

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हटले की, “RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांसाठी KYC अपडेट करणे बंधनकारक आहे. आता तुमचे खाते 31.03.2022 पर्यंत KYC अपडेटसाठी प्रलंबित राहिल्यास, तुम्हाला 31.08.2022 पूर्वी तुमचे KYC अपडेट करण्यासाठी तुमच्या मूळ शाखेशी संपर्क साधण्याची विनंती केली जात आहे. अशाप्रकारे अपडेट न केल्यास तुमच्या खात्यातील व्यवहारांवर बंदी येऊ शकेल.

KYC म्हणजे काय ???

KYC म्हणजे Know Your Customer. हे जाणून घ्या कि, KYC हे ग्राहकाची माहिती देणारे डॉक्युमेंट आहे. याद्वारे ग्राहकाकडून स्वतःबद्दलची सर्व आवश्यक असलेली माहिती दिली जाते. बँकेकडून दर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी आपल्या ग्राहकांना केवायसी फॉर्म भरण्यास सांगितले जाते. या KYC फॉर्ममध्ये नाव, बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि पूर्ण पत्ता द्यावा लागतो. अशा प्रकारे बँकेला ग्राहकाची सर्व माहिती दिली जाते. PNB

KYC for foreign portfolio investors - iPleaders

अशाप्रकारे करा KYC

KYC करण्यासाठी ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेच्या शाखेत जा. तेथे जा आणि संबंधित डेस्कवरून KYC फॉर्म घ्या आणि तो फॉर्म भरल्यानंतर आणि त्यामध्ये सर्व आवश्यक डॉक्युमेंट जोडल्यानंतर सबमिट करा. KYC फॉर्म सबमिट केल्यापासून 3 दिवसांत तुमचे KYC अपडेट केले जाते. PNB

KYC करणे महत्वाचे का आहे ???

ग्राहक आणि वित्तीय संस्था या दोघांसाठी KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याद्वारे बँकेला ग्राहकाची सर्व अपडेटेड माहिती मिळते. तसेच ग्राहकाला देखील इतर कोणीही त्याच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाही याची गॅरेंटी मिळते. कारण जेव्हा जेव्हा एखादा व्यवहार केला जातो तेव्हा त्याची माहिती ग्राहकांना ऑनलाइन/मेसेजद्वारे लगेचच मिळते. PNB

PNB Q1 results: Net profit slumps 70% YoY to Rs 308 cr - BusinessToday

अशा प्रकारे घरबसल्या पूर्ण KYC

आता बँकेमध्ये न जाता घरबसल्या KYC पूर्ण करता येईल. यासाठी डॉक्युमेंट बँकेला ई-मेल करा. याशिवाय आधारद्वारे मोबाइलवर OTP मागवून KYC ही पूर्ण करता येईल. अनेक बँकाकडून नेट बँकिंगद्वारे देखील KYC ची सुविधा दिली जाते. PNB

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/

हे पण वाचा :

HDFC Bank ने देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Vivo V25 Pro : 64MP कॅमेरावाला Vivo चा दमदार मोबाईल लाँच; पहा फीचर्स आणि किंमत

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!!

Milk Price : देशाच्या इतर भागांच्या तुलनेत ‘या’ शहरामध्ये कमी दराने मिळते दूध !!!

Indusind Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा !!!