Sunday, June 4, 2023

16 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार अन् नंतर खून, क्रुर आई वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी ‘असं’ पकडलं

सोलापूर | बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका मजुराने आपल्याच सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचारानंतर वडील अन् आईनेच सदर मुलीचा गळा आवळून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका जोडप्याने आपल्याच अवघ्या 16 महिन्यांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. सिकंदराबाद येथेच वडीलांनी स्वत: च्या पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ते सदर चिमुकलीचा मृतदेह घेऊन आपल्या राजस्थान येथील मूळगावी निघाले होते.

राजस्थान येथील मूळगावी जाऊन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची अशा नियोजनाने एक २२ वर्षांची तरुणी अन् २६ वर्षांचा तरुण असे जोडपे रेल्वेने प्रवास करत होते. सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करताना सोलापूर जवळ सहप्रवाशांना बाळाची काहीच हालचाल नसल्याने शंका आली.

सहप्रवाशांना जोडप्यावर संशय आल्याने त्यानी रेल्वे पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर सोलापूर स्थानकावर रेल्वे गाडी थांबली असताना महाराष्ट्र पोलिसांनी सदर जोडप्याला शोधून त्यांची झडती घेतली. यावेळी ते एका 16 महिण्याच्या मुलीचा मृतदेह घेऊन निघाले असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयीत आरोपी आणि त्यासोबत त्याच्या पत्नीला देखील ताब्यात घेतले आहे. लोहमार्ग सहायक पोलीस निरीक्षक अमोल सुभाष गवळी यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या सोळा महिन्याच्या मुलीवर वडीलाने राहते घरी अनैसर्गीक पध्दतीने लैगीक अत्याचार केला. आणि त्यांनतर तिचा गळादाबून ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. लोहमार्ग पोलिसांनी कलम 302, 201, 376, 377, 511, 34 भादवि बाल लैगींग अत्याचार अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता हैदराबाद पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

संशयीत आरोपी हा पत्नी सोबत संगणमत करुन त्याची मृत मुलीचा मृतदेह घेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे मुळगावी राजस्थान येथे सिकंदराबाद राजकोट या रेल्वेने घेवून जात होता. सदर गुन्ह्याच्या प्रकारात त्याची पत्नी आरोपीचा बचाव करण्याच्या उद्देशाने तो गुन्हा दडवून ठेवून मयत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेने घेवून जात होते.

लोहमार्ग पोलिसांनी पती पत्नीला अटक केले आहे. सदरचा गुन्हा हा केसरा पोलीस ठाणे जिल्हा रंगारेडडी येथे घडलेला आहे. सदरचे कागदपत्रासह संशयीत आरोपी हैद्राबाद वर्ग करीत आहोत अशी माहिती गणेश शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक यांनी दिली आहे.