परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. मृत 17 वर्षीय तरुणाचे नाव नाविद असे आहे. तो शहरातील भोईगल्ली परिसरातील रहिवासी होता. आज सकाळी परभणी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात नाविदचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी नाविदचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता मृत नाविदच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत नाविद याची नेमक्या कोणत्या कारणातून हत्या झाली? हे अजून समजू शकलेले नाही. चारही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याचा शोध पोलीस घेत आहेत.