स्कूटर घेऊन गेला अन् 2 दिवसांनी नदीत आढळला मृतदेह; महाविद्यालयीन तरुणाचा हृदयद्रावक अंत

sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वणी : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजूर कॉलनी याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आपल्या काकांच्या घरी वास्तव्याला असणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत तरुण हा शनिवारी स्कूटर घेऊन घराबाहेर पडला तो परत घरी परातलाच नाही. त्यानंतर दोन दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीत त्याचा मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे.

या 17 वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव समेध तारक वाघमारे असे आहे. तो लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणानिमित्त तो आपल्या काकांच्या घरी राजूर कॉलनी या ठिकाणी राहत होता. दरम्यान शनिवारी समेधनं बाहेर जायचं असल्याचं सांगत घरातून स्कूटरची चावी घेतली आणि घराबाहेर पडला. बराच वेळ झाला तरी तो परत घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांची देखील चिंता वाढली. यानंतर कुटुंबीयांनी समेधचा सर्वत्र शोध घेतला.

कुटुंबीयांनी जवळच्या नातेवाईकांडे आणि मित्र परिवारकडे चौकशी केली, पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. यादरम्यान शोधाशोध केली असता रविवारी वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावर त्याची दुचाकी आढळून आली. यानंतर समेधनं आत्महत्या केली असावी, असा संशय कुटुंबीयांना आला. त्यामुळे त्यांनी नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान सोमवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीपात्रात समेधचा मृतदेह आढळून आला. समेधने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अजूनही स्पष्ट झाले नाही.