मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्यात पेट्रोल ऐवजी भरलं पाणी

MOHAN YADAV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ गाड्यात पेट्रोल ऐवजी पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हीं घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे ‘एमपी राईज २०२५’ कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. तत्पूर्वी हि घटना घडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाने कडक कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप तात्काळ सील केला आहे.

नेमकं काय घडलं –

मुख्यमंत्री मोहन यादव यांचा ताफा रतलाम येथे एमपी राईज 2025 कॉन्क्लेव्हसाठी रवाना झाला होता. त्यामुळे, या ताफ्यातील 19 इनोव्हा कारमध्ये डिझेल भरण्यासाठी ढोसी गावातील पेट्रोल पंपावर त्या कार थांबल्या होत्या. तिथे डिझेल भरल्यानंतर काही अंतर कापल्यानंतर अचानक सर्व वाहने थांबली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व वाहनांमधून पेट्रोल रिकामे केले असता त्यातून पाणी बाहेर पडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. चालकांनी पेट्रोल पंपावर याबाबत तक्रार केली. यासोबतच काही इतर ट्रक चालकही हीच तक्रार घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले.

कोणत्या पेट्रोल पंपावर घडली घटना ?

हि घटना भारत पेट्रोलियमच्या शक्ती फ्युएल्स पेट्रोल पंपावर घडली. या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियमचे प्रादेशिक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न आणि पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाहनांच्या पेट्रोल टाक्या उघडण्यात आल्या असत्या सगळा पर्दापाश झाला. वाहनात जे २० लिटर पेट्रोल भरलं होते त्यात १० लिटर पाणी मिक्स केलं होते… महत्वाचं म्हणजे १-२ नव्हे तर सर्वच्या सर्व १९ गाड्यांमध्ये असा प्रकार आढळून आला. या घटनेनंतर सदर पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने पेट्रोल पंप तात्काळ सील केला.