सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भारतीय सैन्यदलाने १९७१ साली बांग्लादेश युध्दात ऐतिहासिक विजय मिळवला होता. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गणिते बदलली होती. त्यामुळे या युद्धाबाबत भारतीयांच्या मनात वेगळे स्थान आहे. दरम्यान या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कराड येथे ‘विजय दिवस समारोह’ दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा विजय दिवस साजरा केला जात आहे.
आज सकाळी नऊ वाजता शोभा यात्रेने विजय दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच १४ डिसेंबर पासून ते १६ डिसेंबर दरम्यान हा विजय दिवस समारोह साजरा केला जाणार आहे. यामध्ये सैनिकांच्या विविध कसरती नागरिकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या प्रसंगी आज कराड शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी शोभायात्रा देखील काढली होती.