कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात 17 एप्रिल रोजी चरेगाव येथील एका 30 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला पुढील उपचारासाठी 25 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.

या दोघांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे दोन्हीही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी या कोरोनामुक्त तरुणांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना हॉस्पिटलमधून निरोप दिला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/638091143586011/

Leave a Comment