संतापजनक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. या दोन्ही भावांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही चुलत भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने तक्रार दाखल केल्यानांतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक करून प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

हि पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून ती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील वस्तीवर राहते. तर दोन्ही आरोपी हे पीडित मुलीचे चुलत भाऊ असून तेही अल्पवयीन आहेत. आरोपी भाऊ हे मागील बऱ्याच दिवसांपासून पीडितेला धमकी देत तिचं लैंगिक शोषण करत होते. दरम्यानच्या काळात आरोपींनी तिच्यावर अनेकवेळा बळजबरी करत बलात्कारसुद्धा केला. यातूनच पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यामुळे हे प्रकरण समोर आले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांसोबत जाऊन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही भावांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी चुलत भावांविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात महिला अधिकारी नसल्यानं या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे.

You might also like