Sunday, March 26, 2023

तब्बल ५ महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमध्ये २जी इंटरनेट सेवा सुरू; सोशल मीडियावर अजूनही बंदी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र । जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल ५ महिन्यांनंतर शनिवारी पोस्टपेड सोबत प्रीपेड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या गृहविभागाने याबाबत एक अधिसूचना जरी केली असून २० जिल्ह्यांना २ जी मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून ३०१ वेबसाईट लोकांना सर्च करणं शक्य होणार आहे. तसेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियाचा वापर करता येणार नसल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू काश्मीरच्या गृहविभागाने दिलेल्या अधिसुचनेनुसार, नागरिकांना सर्च इंजिन, बँकींग, शिक्षण, बातम्या, प्रवास, सुविधा आणि रोजगार यासंबंधित वेबसाईट्सचाच वापर करता येणार आहे. पोस्टपेड आणि प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना आता डेटा सेवेचा लाभ घेता येणार आहा. ३१ जानेवारीपर्यंत मोबाईलवर २जी इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानंतर याची समीक्षा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं या अधिसुचनेत म्हटलं आहे.

- Advertisement -

 

काही दिवसांपूर्वी जम्मू विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये ‘२-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र ही सुविधा केवळ पोस्टपेड मोबाईलसाठीच उपलब्ध होती. तसेच हॉटेल, रुग्णालय, ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधीत ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आली. प्रशासनाच्या आदेशानंतर १५ जानेवारीपासून इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली. त्यानुसार इंटरनेट सुविधा जम्मू, सांबा, उधमपूर, कठुआ, आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. इंटरनेटवरील निर्बंधांमुळे काश्मीरमधील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानंतर प्रशासनानं राज्यात २ जी इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा- 

फेसबुकच्या मार्केटिंग संचालकपदी अविनाश पंत; भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी फेसबुकची नवी रणनीती

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचा केंद्राचा निर्णय असंवैधानिक – बाळासाहेब थोरात

असे बनले भारताचे संविधान…