महाबळेश्वर- महाड रस्त्यावर 2 ठार, 2 गंभीर जखमी : दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्वर तालुक्यात महाड ते महाबळेश्वर जाणाऱ्या रोडवर रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल अप्सरा समोर दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर – महाड रस्त्यावर रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये महाबळेश्वरचे रहिवासी जुबेर मुस्तफा मानकर आणि सोलापूर मंगळवेढा येथील आकाश तानाजी भोसले हे दोन जण ठार झाले. तर अमिन बिसमिल्ला शेख, दरिबा सुनिल बळवंतराव उर्फ गोट्या  दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वरहून महाडला जाणाऱ्या रोडवर दुचाकी चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

महाड- महाबळेश्वर रस्त्यावर (MH-12-BW-2767) आणि (MH-13-CR-7193) या दोन दुचाकीच्यात भीषण अपघात झाला. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भागवतत पुढील तपास करीत आहेत