भेळ खायला देण्याच्या बहाण्याने 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे अल्पवयीन मुलींना भेळ खायला देण्याच्या बहाण्याने एकाने दोघींवर अत्याचार केल्याची घटना झाली आहे. या प्रकरणी धनंजय बाजीराव गायकवाड (रा. झिरपवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिडीत मुलीच्या आईने सदर घटनेची फिर्याद फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झिरपवाडी येथे दि. 27 जुलै रोजी 2 वाजताचे सुमारास धनंजय बाजीराव गायकवाड याने यातील पिडित दोन्ही अल्पवयीन मुलींना तुम्हाला भेळ खायला देतो, असे म्हणून त्याचे राहते घरात घेवून गेला. त्या दोन्ही अल्पवयीन आहेत हे माहित असताना सुद्धा दोन्ही मुलींची कपडे काढून त्यांना बेडवर झोपून स्वतःचीही कपडे काढून त्यांच्यावर आळीपाळीने जबरीने संभोग केला.

सदर घटनेबाबत कोणाला काही सांगायचे नाही, असा दम त्या दोन्ही बालिकांना दिला. यामधील पिडित बालिका हिचे वडील बाहेरगावी गेले होते. पीडितेच्या आईने पतीला आल्यानंतर घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी घरात चर्चा करून फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.

सदर नराधमास अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे करीत आहेत. पोलीस निरीक्षक भारत किंद्रे हे जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्ये मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment