Breaking | कराडमध्ये 2 कोरोना अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 30 वर्षीय पुरुष अशा दोघा अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट कोरोना (कोव्हिड 19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

मागील महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापामुळे दाखल केले होते. त्याचा अहवाल आज आला असून सदर व्यक्ती कोरोनाबाधित निघाला आहे. तर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 30 वर्षीय पुरुष, जो गेल्या महिन्यात पुण्यावरून आला होता, त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे भरती केले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 30 वर्षीय पुरुष अशा दोघा अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट कोरोना (कोव्हिड 19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

मागील महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापामुळे दाखल केले होते. त्याचा अहवाल आज आला असून सदर व्यक्ती कोरोनाबाधित निघाला आहे. तर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 30 वर्षीय पुरुष, जो गेल्या महिन्यात पुण्यावरून आला होता, त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे भरती केले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दरम्यान, सदर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा पोलिस तपास घेत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १३ वर पोहोचली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून कफण्यात येत आहे.

Leave a Comment