हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील २ पक्ष संपुष्टात येणार आहेत असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीबाबांनी हा दावा केला आहे. आतापर्यंत झालेलं मतदान आणि ७, १३ आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर विरोधकांसाठी धक्कादायक निकाल असतील. अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकित पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पराभवाच्या भीतीने बावचळले आहेत असेही त्यांनी म्हंटल.
राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. ते सत्तेवर राहिलं असतं तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची एकही जागा निवडून आली नसती म्हणूनच भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडून जे आमदार गेले. त्यांना मतदार आपल्या बरोबर आहेत, असे वाटत असेल तर त्यांचा तो भ्रम या निवडणुकीत दूर होईल. कारण महाराष्ट्रातील जनता गद्दारीला, विश्वासघाताला थारा देत नाही असेही त्यांनी म्हंटल. शरद पवारांबद्दल पंतप्रधान भटकती आत्मा म्हटल्यानंतर भाजपला मोदींचे फोटो असलेले पोस्टर्स काढावे लागले. इतका लोकांच्यात राग असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
उदयनराजेंना निवडून यायची खात्री नाही
सातारा लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी बऱ्याच सभा झाल्या. राज्यसभा देतो. मंत्रिपद देतो. कारखान्याला कर्ज देतो, अशी बरीच आश्वासन दिली गेली. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. २०१९ मध्ये उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देवून पोटनिवडणूक लढवली होती. पण, आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. जर निवडून यायची खात्री असती तर राजीनामा देवून निवडणूक लढली असती, असं सांगून ते पुढे म्हणाले, या निवडणुकीचा जो निकाल निक लागेल तो बराच अनपेक्षित असेल