सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक; एकच छंद गोपीचंद असा दिला नारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्यानंतर आता राजकीय वातावरण गरम झाल आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर 2 युवकांनी दगडफेक केली आहे. एकच छंद गोपीचंद असा नारा देत 2 इसमांनी ही दगडफेक केली आहे.

राष्ट्रवादी कार्यालयाच्या खिडक्‍यांच्या काचा दगडांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न अज्ञात दोन इसमांनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे कारण तोडफोड करताना एकच छंद गोपीचंद असा नारा हे दोन्ही इसम देत होते.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक; एकच छंद गोपीचंद असा दिला नारा

कालच पडळकरांच्या गाडीवर झाली होती दगडफेक –

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सोलापूर दौऱ्यावेळी आले असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही.

Leave a Comment