सातारा सिव्हिल सर्जनाचे 2 शिक्के चोरीला, पोलिसांत तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय प्रतिपूर्ती वेतन देयक विभागातून अज्ञाताने सिव्हिल सर्जन यांचा चाैकोनी शिक्का, तसेच राजमुद्रेचा गोल शिक्का चोरून नेली. याप्रकरणी कर्मचारी दीपाली झोरे (रा. तामजाईनगर, करंजे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय प्रतिपूर्ती वेतन देयक विभाग असून, त्याचे कामकाज जिल्हा शल्यचिकित्सकाच्या थेट देखरेखीखाली सुरू असते. शासकीय कर्मचाऱ्यांनी आजारापोटी घेतलेले उपचार आणि त्यासाठी झालेल्या खर्चाची विले शासनास सादर करण्यासाठीच्या कागदपत्रांची तपासणी या ठिकाणी होते. कामादरम्यान या विभागातून अनावाने जिल्हा शल्यचिकित्सकांचा नोंदणी असणारा मराठी भाषेतील चौकोनी शिक्का आणि इंग्रजी भाषेतील राजमुद्रा चोरून नेली. शिक्के आणि राजमुद्रा सापडत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला, मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे झोरे यांनी त्याची माहिती वरिष्ठांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना दिली.

त्यानंतर याबाबतची तक्रार दीपाली झोरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी अज्ञातावर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार ठोंबरे तपास करीत आहेत. यापूर्वी याच रुग्णालयातील एका विभागातून तपासणीसाठी आवश्यक असणारे मशिन चोरीस गेले होते. याप्रकरणी देखील सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल असून, वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे जिल्हा रुग्णालयाची सुरक्षितता धोक्यात आली आहे

Leave a Comment