शेळी चोर समजून 2 तरुणांना गावकऱ्यांकडून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी शेळी चोरीचा संशय घेऊन दोन युवकांना चोर समजून मारहाण (2 youths were brutally beaten by villagers) केली आहे. हि धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात घडली आहे. या तरुणांना मारहाण (2 youths were brutally beaten by villagers) करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा झाला होता.

काय घडले नेमके ?
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खडकी बाम्हणी गावामध्ये हि घटना घडली आहे. खडकी बाम्हनी गावात मागील 10 दिवसांपासून शेळ्या चोरीच्या घटना सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात अनोळखी व्यक्ती आला की गावकऱ्यांकडून त्यांची विचारपूस होते. मात्र बुधवारी गावात दोन अनोळखी तरुण आले होते. गावकऱ्यांनी या तरुणाला रोखले आणि विचारपूस सुरू कली. या तरुणांनी आपण कुठून आलो याची माहिती दिली. पण, गावकऱ्यांचे काही समाधान झाले नाही.

या तरुणांनी योग्य उत्तर न दिल्यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावला आणि हेच दोघे शेळी चोर असल्याचे समजून या दोघांना लाठ्या काठ्यानी मारहाण (2 youths were brutally beaten by villagers) केली. या तरुणांनी गयावया केली पण गावकऱ्यांचा जमाव या तरुणांचे काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्तिथीत नव्हता. गावातील भर रस्त्यात या तरुणांना मारहाण (2 youths were brutally beaten by villagers) करण्यात आली. यानंतर या दोघांना गावकऱ्यांनी डूग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन केले. डूग्गीपार पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; JCBच्या साहाय्याने नागरिकांचे रेस्क्यू
विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’; राज ठाकरे- एकनाथ शिंदें भेटीवर मनसेचं सूचक ट्विट
Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ???
चोरी करून स्विच ऑफ केलेल्या फोनचे ‘या’ App द्वारे कळेल लोकेशन
5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे !!!