व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’; राज ठाकरे- एकनाथ शिंदें भेटीवर मनसेचं सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तब्बल अनेक वर्षानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यातच आता मनसेने राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीचा एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे. प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब. विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’ झालाय. ‘एक’ साहेब आणि ‘एक’नाथ साहेब असं म्हणत खोपकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नवीन घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसला. त्यामुळे राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. मात्र एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भेट भविष्यातील राजकारणाला नवं वळण देणारी ठरेल का हे सुद्धा लवकरच कळेल. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर असतानाच भाजप- शिंदे गट आणि मनसे यांच्यातील वाढलेली जवळीक बरंच काही सांगून जात आहे.