Wednesday, October 5, 2022

Buy now

घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात 20-25 मिनिटे बत्ती गुल, व्हेंटिलेटर पडले बंद

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील मेडिसिन विभागातील अतिदक्षता विभागात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास 15 ते 20 मिनिटे बत्ती गुल झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. अतिदक्षता विभाग आतच लाईट गेल्याने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नाही. मात्र सुदैवाने यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

शहरातील घाटी रुग्णालयात जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक रुग्ण दररोज उपचारासाठी दाखल होतात. याच ठिकाणी त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळणे अपेक्षित असते. परंतु, याच ठिकाणी असणाऱ्या अतिदक्षता विभागात आज सायंकाळच्या सुमारात 20 मिनिटे बत्ती गुल झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता.

या दरम्यान रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांनी हाताने पंपिंग करून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला. या दरम्यान जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न रूग्णाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकाने लाईट कधी येणार विचारले असता तुमचा पेशंट घेऊन जा असे उद्धटपणे उत्तरे तेथील कर्मचारी आणि डॉक्टर देत होते असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले आहे