औरंगाबाद | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 20 एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देण्यात आलेल्या सूचना महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शहरात 20 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बऱ्याच ठिकाणी 5 ते 6 दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वाधिक फटका सिडको-हडको या भागाला होतो. त्यामुळे एक्सप्रेस लाइनवरील क्रॉस कनेक्शन बंद करून गारखेडा येथील पाण्याच्या टाकीवरून शिवाजीनगर पुंडलिकनगरला पाणी देण्याचा प्लान महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी नवीन सम्ब बांधल्या जाणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही किलोमीटरची पाईपलाईन बदलून आणि पाणी उपसा करण्यासाठी 1 हजार हॉर्सपॉवरचे पंप धरणावर बसविण्याचा पर्याय सुचवला होता. यातून किमान 20 एमएलडी जास्तीचे पाणी शहराला मिळेल असे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. परंतु महापालिका प्रशासनाने हा पर्याय योग्य नसल्याचे म्हणणे आहे. सिडको भागातील टाक्यांमध्ये आलेल्या एक्सप्रेस लाईन वरून अनेक भागात पाणीपुरवठा केला जातो. शिवाजी नगर गारखेडा पुंडलिक नगर परिसरात हा पाणीपुरवठा होतो. जर पुंडलिक नगर ऐवजी गारखेडा परिसरातून हा पाणीपुरवठा केला तर हा प्रश्न मार्गी लागेल.