अग्नीविराच्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे अपघाताच्या अनेक घटना बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कल्याण रेल्वे (kalyan railway station) स्थानकावरील आहे. 21 वर्षीय तरुण धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावाहून भारतीय सैन्याच्या अग्निवीरच्या भरतीसाठी (agniveer bharti) कल्याणमध्ये आला होता. तो एकटाच नव्हता त्याच्यासोबत गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील इतर तरुणही होते. अग्नीवीर भरतीसाठी (agniveer bharti) जायच्या आधीच या मुलाचा दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत अपघात झालेल्या मुलाचे नाव रामेश्वर देवर आहे.

रामेश्वर ने कम्प्युटर डिप्लोमा केला होता आणि तो आता नोकरीच्या शोधात होता. आयुष्यात काहीतरी करायचं आणि सेटल व्हायचं हे रामेश्वरच्या डोक्यात पक्के बसले होते. चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी काही कोर्सेस ही केले होते. तो सतत शिक्षण घेण्याच्या विचारात असायचा. त्याचबरोबर तो आपल्या आई वडिलांना शेतात ही मदत करायचा. रामेश्वरला भारतीय सैन्यात नोकरी करण्याची प्रचंड इच्छा होती. सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी असा त्याचा विचार होता.

या व्हिडिओत आपण पाहू शकता रामेश्वरला मळमळ झाल्याने तो रेल्वे ट्रॅक जवळ गेला. तो फलटावरून वाकून उलटी करत असतानाच अचानक भरधाव वेगाने लोकल ट्रेन (local train) आली आणि तीने रामेश्वरच्या डोक्याला जोरात धडक दिली. या धडकेत रामेश्वर 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. या घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण वडजाई गावावर शोककळा पसरली आहे. रामेश्वरच्या पश्चात आई-वडील बहीण भाऊ असा परिवार आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?