पुण्यातील 20 वर्षीय तरुणीला निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्याने दिल्या ‘या’ नरक यातना

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील लोणी काळभोर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 30 वर्षीय तरुणाने घराजवळ राहणाऱ्या एका तरुणीला हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बहाणा करून तिच्यावर अत्याचार केला. हे दोघेजण जेवण करून परत येत असताना आरोपीने एका निर्जनस्थळी कार थांबवून पीडित तरुणीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले आहेत. यानंतर पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
आरोपी तरुण आणि पीडित महिला हे दोघेही लोणी काळभारे परिसरातील रहिवासी आहेत. हे दोघेही एकमेकांच्या घराशेजारी राहतात. घटनेच्या दिवशी आरोपी तरुणाने पीडित तरुणीला जेवणासाठी बाहेर जाऊ असे सांगितले. तसेच मला तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचा आहे असेदेखील सांगितले. हा आरोपी तरुण पीडित महिलेच्या चांगला ओळखीचा असल्याने हि पीडित तरुणी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.

यानंतर हे दोघेजण घटनेच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास खराडी येथील ‘पाजी दा ढाबा’ या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले. यानंतर जेवण केल्यानंतर दोघंही कारने परत खराडीवरून लोणी काळभोरकडे येण्यासाठी निघाले. घरी परतत असताना आरोपीने खराडी ते लोणी काळभोर रस्त्यावरील एका निर्जनस्थळी गाडी थांबवली. यानंतर त्याने पीडितेसोबत जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करून पुढील तपासाला सुरवात केली आहे.