कोरो इंडिया संस्थेकडून सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटलला 200 बेडशीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोविड रुग्णांसाठी महत्वपुर्ण सेवा बजावणाऱ्या सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटलला कोरो इंडिया मुंबई या संस्थेच्यावतीने 200 बेडशीट देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी स्वयंम संस्थेच्यावतीनेही 10 हजार एन 95 मास्कचे वितरण करण्यात आले.
सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये  200 बेडशीट रुबी हेल्थ केअर सर्व्हिसेसचे अपूर्व शहा, व्यवस्थापक सुरेंद्र दबडे, एचआर व्यवस्थापक प्रवीण दाभाडे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी कराड पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, कोरो इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक वैशाली रायते, ज्ञानदीप सामाजिक संस्था कराडचे आनंदा थोरात, स्वयंम संस्थेचे मनोज विधाते, आधार संस्थेचे सचिन कांबळे, औषध निर्माणाधिकारी दिलीप यादव, प्रथम संस्थेचे युवराज भांडवलकर, बंधुत्व प्रतिष्ठानचे अनिल वीर, रिध्दीसिध्दी संस्थेचे विजय काळेल, करिश्मा जाधव उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य सुविधांची मर्यादा लक्षात घेत रुग्णांच्या वैद्यकीय सुविधांबरोबरच त्यांना मानसिक बळ देण्याबरोबरच योग्य सल्ला उपलब्ध होण्यासाठी कोरो
इंडिया संस्थेचे सुर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून वैशाली रायते, माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, माधव गडदे, सचिन लवटे, स्वाती सावंत, भारती पवार यांच्या प्रयत्नातून विविध सामाजिक संस्थांच्या मागणीवरुन बेडशीट उपलब्ध करण्यात आले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment