२०११ वर्ल्ड कपचा अंतिम सामना फिक्स प्रकरण; चौकशीसाठी संगकाराला समन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलंबो । भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेलेला आयसीसी वर्ल्ड कप २०११चा अंतिम सामना फिक्स झाला होता याची श्रीलंकेत चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी श्रीलंकेतील चौकशी पथकाने माजी कर्णधार कुमार संगकारा याला समन्स बजावले आहे. काल चौकशी पथकाने दोघांची साक्ष नोंदवली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेटनी पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताच्या या विजेतेपदावर श्रीलंकेच्या माजी क्रीडमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावेळी महिंदनंदा अळूठगमगे हे लंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील वृत्तवाहिनी न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत वर्ल्ड कपमधील हा सामना फिक्स झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर २०११च्या लंकेच्या वर्ल्ड कप समितीचे प्रमुख असेलल्या अरविंदा डिसिल्वाने याची चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, अळूठगमगे यांनी अंतिम सामना फिक्स झाल्याचा आरोप केला होता तेव्हा संगकाराने ते आरोप फेटाळून लावले होते. त्याने अळूठगमगे यांच्याकडून फिक्सिंग झाले असल्यास त्याचे पुरावे द्या अशी मागणी केली होती.

दरम्यान, २०११ वर्ल्ड कपमधील अंतिम सामना फिक्स असल्याच्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लंकेच्या क्रीडा मंत्रालयाचे सचिव केडीएस रुवानचंद्रा यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले होते. या प्रकरणी काल माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती प्रमुख डिसिल्वा आणि माजी फलंदाज उपल तरंगा यांची साक्ष घेण्यात आली. आता आज पोलिस कुमार संगकाराची साक्ष नोंदवणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”