2019 ला युती केली नसती तर १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो ; फडणवीसांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर शिवसेनेशी युती न करता आपण स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या निवडून आल्या असत्या, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीबपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकीताचा संदर्भ फडणवीस यांनी दिला आहेत. भाजप स्वबळावर लढला असता तर 150 जागा नक्की आल्या असत्या, पण आम्ही तेव्हा त्यांचं ऐकलं नाही, अस फडणवीस म्हणाले.

मोदींनी राष्ट्रवादाला खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची जोड दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी सामान्य लोकांसाठी काम करुन भारताचा जीडीपी सर्वात जास्त होईल असं काम केलं. पंतप्रधान आवास योजना, शौचालय आणि सर्वसामान्य जनतेच्या उपयुक्त योजनांना त्यांनी प्राधान्य दिलं. देशाच्या आर्थिक उत्पन्नापेक्षा सर्वसामान्यांना रोजगार कसा मिळेल याकडे मोदींनी लक्ष दिलं. कोरोनाच्या काळात देखील केवळ मोदींमुळे विदेशी गुंतवणूक झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like