मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची अल्प प्रमाणात पीछेहाट होताना दिसते आहे. मात्र युतीची मोठी हानी होणार नाही हे एक्सिट पोल वरून स्पष्ट होताना दिसते आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन आकडी संख्या गाठताना दिसते आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी आपले वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. तरी देखील सर्वात विश्वसनीय असणारा अंदाज म्हन्जे भाजपला १९ जागी विजय मिळू शकतो. तर शिवसेनेला १५ जागी समाधान मानावे लागते आहे. तर काँग्रेसची राज्यात दमदार एंट्री होत असून काँग्रेसला ८ जागी विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर राज्याच्या राजकारणातील सर्वात संवेदनशील पक्ष म्हणजे राष्ट्रवादीच्या खात्यात ६ जागा जाणार असल्याचे या एक्सिट पोल मध्ये म्हणण्यात आले आहे.
सर्वसाधारण अंदाज लावायचा झाल्यात ३४ ते ४० च्या दरम्यान युतीच्या जागा राहणार असल्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडी ८ ते ११ जागा जिंकण्याची शक्यता आहे.