२०२० रक्षाबंधन स्पेशल : सर्व राशींच्या लोकांना ‘ हे ‘ राख्यांचे रंग असतील लाभदायी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन हा असा सण आहे कि बहीण भावाच्या आनंदाला पारावर नसतो. राखी म्हणजे फक्त धागा नव्हे तर त्यामागे भावना असतात. राखी म्हणजे एक प्रकारचं रक्षा च सूत्र आहे. त्यामुळे बहीण आपल्या भावाला बांधून सुखी जीवनाचे मनोकामना देवाकडे मागत असते. त्याबरोबरच सगळे भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी छानस गिफ्ट देतो. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाच्या राख्या आहेत. परंतु ज्योतिषाचार्य डॉ शोनू मेहरोत्र सांगतात कि, ज्योतिष विज्ञानाच्या अनुसार प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधली पाहिजे . भावाच्या राशी प्रमाणे त्याच्या राखीचा कलर घेतला जावा. ते सर्वात शुभ असत.

मेष —
जर तुमच्या भावाची रस मेष असेल तर त्याचा स्वामी मंगल असतो. मेष ज्यांची रस आहे त्यांनी लाल रंगाची राखी बांधणं शुभ मानलं जात. त्यामुळे त्याच्या जीवनात भरपूर ऊर्जा राहते.

वृष–
या राशी मधील लोकांचा स्वामी शुक्र असतो. त्यामुळे या लोकांसाठी सफेद रंगाची राखी बांधू शकता. त्यामुळे त्याच्या जीवनात अनेक चांगले परिणाम होतील.

मिथुन–
या राशींमधील लोकांचा स्वामी बुध असतो. या लोकांना कोणत्याही रंगाची राखी बांधली तरी त्याच्यासाठी शुभ असते. त्यांना सुख,समृद्धि आणि दीर्घायुष्य लाभते.

कर्क–
या राशी मधील लोकांचा स्वामी चंद्रमा असतो. या लोकांसाठी सफेद किंवा चांदीच्या राखी त्यांच्यासाठी लाभदायक असते. या रंगामुळे या राशीतील लोकांच्या जीवनात भरपूर आनंद मिळतो.

सिंह–
या राशी मधील भावांना पिवळ्या रंगाची राखी बांधणं किंवा मुरूम रंग त्याच्यासाठी खास असतो. त्याच्या राशी मधील स्वामी सूर्य असतो.

कन्या–
या राशींमधील लोकांचा स्वामी बुध असतो. त्यामुळे जास्त करून या भावांसाठी हिरव्या रंगाची राखी त्या लोकांसाठी फायदेमंद असते. त्यामुळे सर्व प्रकारचे ग्रह दोष नाहीसे होतात. आणि महत्वाचं म्हणजे भाऊ बहिणीच्या मध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते.

तुळ —
या राशी मधील लोकांसाठी चांदी किंवा सफेद रंगाची राखी बांधायला हवी. या राशी मधील लोकांचा स्वामी शुक्र असतो.

वृश्चिक–
या लोकांसाठी लाल रंग चांगला आहे.

धनु–
या राशी मधील लोकांचा स्वामी बृहस्पति आहे त्यामुळे यांच्यासाठी पिवळ्या मध्ये पण सोनेरी रंग असायला हवा .

मकर–
या राशी मधील लोकांचा स्वामी शनिदेव असतो. तसेच त्यांना न्याय देवता म्हंटल जात. यासाठी निळ्या रंगाची राखी योग्य हे.

कुंभ–
यांच्यासाठी गडद निळ्या रंगाची राखी वापरली जावी. तसेच त्यांना रुद्राक्ष ची राखी बांधली तरी चालेल.

मीन–
या लोकांसाठी पिवळा रंग तसेच सोनेरी रंग सुद्धा लाभकारक असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like