२०२० रक्षाबंधन स्पेशल : राखी बांधण्यापाठीमागे आहे ‘ही’ पौराणिक कथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन हा सण सर्व भारतभर साजरा केला जातो. साजरा करण्यामागे भाऊ बहीण यांच्यामध्ये असलेले अतूट नातं , प्रेम आणि भावना यांचा समावेश असतो. यावर्षी ३ ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आला आहे. या दिवशी भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. अनेक पुराणिक कथांमध्ये सुद्धा रक्षाबंधनचा समावेश आहे. त्यामध्ये लिहले आहे कि, एकदा माता लक्ष्मी ने बली याना आपला भाऊ मानून भगवान विष्णू याना दिलेल्या वचनापासून मुक्त केले होते. त्यासंदर्भातील हि पुराणिक कहाणी आहे.

रक्षाबंधन केव्हा सुरु झाले असं नाही सांगता येणार परंतु अनेक पुराणिक कथांमध्ये रक्षाबंधन च्या कथा ऐकायला मिळतात. सगळ्यात आधी माता लक्ष्मी यांनी राजा बली याना राखी बांधली होती तेव्हा पासून रक्षाबंधनाची प्रथा पडली आहे. पुराणिक कथांच्या अनुसार एकदा राजा बली ने १०० यज्ञ पूर्ण करून स्वर्ग वर स्थान निर्माण केलं होत. यामुळे इंद्र आणि सारे देव घाबरले होते. सगळे मिळून भगवान विष्णू यांच्याकडे गेले. आणि रक्षणासाठी मदत मागू लागले. तेव्हा भगवान विष्णू यांनी वामन अवतार धारण केला . त्यानंतर वामन अवतारात ते राजा बली च्या जवळ गेले आणि भिक्षा मध्ये त्यांनी तीन पग जमीन मागितली .राजा बली ने त्यांना जमीन देण्याचे वचन दिल. तर विष्णू यांनी दोन पग मध्येच पूर्ण पृथ्वी त्याच्या नावावर केली . त्यानंतर बली च्या लक्षात आले कि, हा कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्यानंतर त्यांनी आपले सिर त्याच्या स्वाधीन केलं. हे पाहून विष्णू राजा बली वर प्रसन्न झाले. आणि वर मागायला सांगितले आणि पृथ्वी वर राहण्यास सांगितले .

त्यावेळी राजा बली ने सांगितलं कि , आपण वचन द्या कि, जे मी मागेन ते आपण मला द्याल , मग त्याने वर मागितला कि पृथ्वीवर तेव्हा राहीन कि जेव्हा तुम्ही तुम्ही माझ्या नजरेसमोर असाल. ते ऐकून भगवान द्विधा मध्ये गेले आणि बली सोबत ते पातळ युगात त्याचा पहारेदार म्हणून राहू लागले. त्यावेळी माता लक्ष्मी त्याची वाट पाहत होती. खूप दिवस नारायण आले नाहीत त्यावेळी नारद यांनी लक्ष्मी माता याना हकीकत सांगितली. राजा बलीच्या वचनाखातर त्यांनी पहारेदार म्हणून राहू लागले आहेत.

माता लक्ष्मी ने त्यावर उपाय मागितला तेव्हा नारद यांनी सांगितले कि, राजा बलीला तुम्ही तुमचा भाऊ म्हणून मान्य करा . राखी बांधा आणि त्याच्याकडून रक्षणाचे वचन घ्याल . त्यावेळी माता लक्ष्मी ने एका साधारण महिलेचे रूप धारण केलं आणि रडत राजा बलीच्या जवळ आली तेव्हा राजाने कारण विचारताच त्यांनी मला कोणी भाऊ नाही. तुम्ही मला तुमची धर्म बहीण बनवा असा प्रस्ताव लक्ष्मी माता यांनी ठेवला आणि रक्षा सूत्र बांधलं रक्षण करण्याचं वचन घेतलं आणि दक्षिणा मध्ये लक्ष्मी माता ने भगवान विष्णू यांना मागितले. अश्या प्रकारे माता लक्ष्मी ने बली को रक्षा सूत्र बांधून भाऊ बनवला तसेच भगवान विष्णू याना दिलेल्या वचन मधून मुक्त केले . अशी आख्ययिका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment