Triumph ने लाँच केल्या 2 आकर्षक Bike, तरुणांना नक्कीच भुरळ पडेल; किंमत किती?

2023 Triumph Street Triple
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये स्ट्रीट बाईक्सची चांगलीच चलती आहे. खास करून देशातील तरुण वर्गाला अशा स्पोर्टी बाईक्स खूपच आवडतात आणि यामुळे बाजारात या गाडयांना मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रिटीश दुचाकी उत्पादक कंपनी ट्रायम्फने भारतीय बाजारात दोन नवीन सुपर बाईक लाँच केल्या आहेत. Street Triple 765 R आणि Street Triple 765 RS अशा २ दोन्ही गाड्यांची नावे आहेत. अतिशय स्पोर्टी लूक असलेल्या या दोन्ही बाईक तरुणांना चांगल्याच आकर्षित करतील यात शंकाच नाही. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही बाईक्सचे फीचर्स, इंजिन आणि किमती याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

फीचर्स –

बाईक्सच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, ट्रायम्फने Street Triple 765 R मध्ये फुल एलईडी लाइटिंग, क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, कॉर्नरिंग एबीएस, लिंक्ड ब्रेकिंग सिस्टम असे फीचर्स दिले आहेत. यामंध्ये रोड, रेन, स्पोर्ट आणि रायडर असे ४ ड्रायव्हिंग मोड मिळतात. तर दुसरीकडे Street Triple 765 RSव्हेरिएन्ट मध्ये लॅप टाइमर, क्रूझ कंट्रोल, पाच-इंचाचा TFT डिस्प्ले, ब्लूटूथ यांसारखी फीचर्स मिळतात. या व्हेरिएन्ट मध्ये रोड, रेन, स्पोर्ट, रायडर आणि ट्रॅक राइडिंग असे एकूण ५ ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत .

इंजिन –

Street Triple 765 मध्ये आधीसारखेच इनलाइन-थ्री-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे, परंतु आधीच्या तुलनेत या नव्या इंजिनची पॉवर आउटपुट वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, Street Triple 765 R मध्ये हे इंजिन जास्तीत जास्त 118.4bhp पॉवर आणि 80Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे, Street Triple 765 RS व्हेरिएन्ट मध्ये हेच इंजिन जास्तीत जास्त 128.2bhp आउटपुट आणि 80Nm पीक टॉर्क जनरेट करते.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, कंपनीने Street Triple 765 R ची किंमत 10.16 लाख रुपये आणि तिच्या सिल्व्हर आय व्हेरिएंटची किंमत 10.43 लाख रुपये ठेवली आहे . तर दुसरीकडे, Street Triple 765 RS ची किंमत 11.81 लाख रुपये आणि कार्निवल रेड, कॉस्मिक येलोची किंमत 12.07 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.