Saturday, March 25, 2023

कराड पालिकेकडून गणपती विसर्जनासाठी 21 जलकुंड

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड पालिका शहरात विविध ठिकाणी 21 जलकुंड तयार केले आहेत. त्याशिवाय उत्सव काळात दर्शनासाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात येणार आहेत, असा निर्णय पालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका व पोलिसांनी शहरातील लोकप्रतिनिधी, मंडळांची बैठक घेतली.

- Advertisement -

या बैठकीस पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, अभियंता अशोक पवार, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हलवान, विनायक पावसकर, सौरभ पाटील, फारूक पटवेकर, राजेंद्र यादव उपस्थित होते.  श्री. पाटील यांनी बैठकीत सूचना केल्या. गणेशमूर्ती विसर्जनाचा कालावधी, विसर्जनासाठी असणारी व्यवस्था यावर या वेळी चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.

या वेळी शहरातील 21 ठिकाणी जलकुंड करण्यात येणार असून, यामध्ये सोमवार पेठ कृष्णा घाटाशेजारी, भैरोबा गल्लीमध्ये, मंगळवार पेठ कृष्णा नाका, पी. डी. पाटील पाणीपुरवठा संस्था, कन्याशाळेसमोर, शुक्रवार पेठ रंगारवेस चौकामध्ये, विठ्ठल चौकामध्ये, पंपिंग स्टेशन नं. २ शेजारील मोकळ्या जागेत. शनिवार पेठ दत्त चौक, कोयनेश्वर मंदिर, दैत्यनिवारणी मंदिर, शाहू चौक, कोल्हापूर नाका, कार्वेनाका पाण्याची टाकी, पी. डी. पाटील उद्यान, मार्केट यार्ड. वाढीव भाग शिक्षक कॉलनी, पोस्टल कॉलनी, शिवाजी सोसायटी, शेततळे अशा ठिकाणी जलकुंड करण्यात आले आहेत. या जलकुंडामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.