सातार्‍यात २१ वर्षीय तरुण कोरोना पोझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेण मुलाणी

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या बाधित रुग्णाचा निकट सहवासित 21 वर्षीय तरुणाचा  रिपोर्ट आला असून तो कोविड बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या १७ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तीन नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 13, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 13, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 9 असे एकूण 68 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, आज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या २१ वर्षीय तरुणाच्या संपार्कात आलेल्यांची प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment