मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना रुग्ण,कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत आता ९९३ करोनाबाधीत रुग्ण झाले आहेत. दुसरीकडे दाखल रुग्णांपैकी आणखी चार रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१ एवढी झाली आहे. मागील २४ तासात ८९६ करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत २०६ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर ५१६ जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment